-
३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
-
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होऊ शकणारे रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जागरुकता निर्माण करणे हे आहे.
-
तंबाखूच्या सेवनामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, फुफ्फुसाचा आजार आणि मधुमेह यांसह चार प्रमुख असंसर्गजन्य रोग होऊ शकतात.
-
धुम्रपान करणे आरोग्यासाठी घातक आहेच पण याचे व्यसन लागले तर ते सोडणे देखील फार कठीण होऊन जाते.
-
अनेकांना धुम्रपानाचे दुष्परिणाम माहित असून देखील त्याचे व्यसन सोडता येत नाही.
-
आज आपण धुम्रपान करण्याचे व्यसन यशस्वीपणे सोडवू शकलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत.
-
सैफ अली खान : बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असणाऱ्या सैफ अली खानला देखील एके काळी धुम्रपानाचे व्यसन होते.
-
सैफ चेन स्मोकर होता. परंतु, ३६व्या वर्षी सैफला ह्रद्याच्या तक्रारी जाणवू लागल्यामुळे त्याने धुम्रपान सोडून दिले.
-
ह्रतिक रोशन : बॉलिवूडमधील सर्वात हॅण्डसम अभिनेता ह्रतिक रोशनला देखील धुम्रपानाचे व्यसन होते.
-
अनेक प्रयत्न करूनही ह्रतिकला हे व्यसन सोडता येत नव्हते.
-
‘इझी वे टू स्टॉप स्मोकिंग’ या पुस्तकाचा ह्रतिकचं धुम्रपानाचे व्यसन सोडण्यामागे फार मोठा वाटा आहे.
-
अर्जुन रामपाल : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीलाही धुम्रपानाचे व्यसन जडले होते.
-
ह्रतिक रोशनने अर्जुन रामपाल आणि त्याच्या पत्नीला जडलेले व्यसन सोडवण्यासाठी मदत केली.
-
कोंकणा सेन शर्मा : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्माला धुम्रपानाचे व्यसन होते.
-
कोंकणा आई झाल्यानंतर बाळाच्या आरोग्यासाठी तिने धुम्रपान करणे सोडले.
-
सलमान खान : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील धुम्रपानाच्या आहारी गेला होता.
-
आरोगाच्या तक्रारी जाणवू लागल्यानंतर त्याने धुम्रपानाला रामराम ठोकला.
-
अजय देवगण : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणदेखील धुम्रपान करायचा.
-
परंतु, रेड या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान त्याने धुम्रपान करणे सोडून दिले.
-
आमिर खान : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानदेखील धुम्रपानाच्या आहारी गेला होता.
-
मुलांच्या हट्टापायी आमिरला त्याचे व्यसन सोडणे भाग पाडले. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख