-
पंजाबचे प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
-
मुसेवाला यांच्यावर आज पंजाबमधील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
यावेळी मुसेवाला यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
-
याआधी मुसेवाला यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळीदेखील मुसेवाला यांच्या हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.
-
आपल्या मुलाला अखेरचा निरोप देताना मुसेवाला यांच्या आई-वडिलांना दु:ख अनावर झाले होते.
-
सिद्धू मुसेवाला यांच्या वडिलाना रडू कोसळले.
-
अंत्ययात्रा तसेच अंत्यसंस्कारादरम्यान मुसेवाला यांच्या चाहत्यांनी पंजाब सकारविरोधात घोषणाबाजी करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
-
मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. तर दुसरीकडे या हत्येची जबाबदारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली आहे.
-
गोल्डी हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार मानला जातो.
-
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी