-
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने भोजपुरी चित्रपट सृष्टीविषयी मोठं वक्तव्य केलंय.
-
राणी चॅटर्जी सोशल मीडिवर सक्रीय असते.
-
या व्हिडीओला कॅप्शन देताना राणी चॅटर्जीने भोजपुरी चित्रपट सृष्टीवर आपला संताप व्यक्त केला.
-
राणी चॅटर्जी म्हणाली, “सोनेरी काळ, हा तो काळ होता जेव्हा हुशार लोकांना काम दिलं जात होतं. चित्रपटातील गाणी नेहमीच सुंदर बनवली जायची.”
-
“आम्ही भोजपुरी चित्रपटांना चित्रपटगृहांपर्यंत पोहचवलं. मात्र, आता चित्रपटगृहातून यूट्यूबवर चित्रपट नेण्यासाठी प्रयत्न होत आहेत,” असा आरोप राणी चॅटर्जीने केला.
-
“आता हा काळ येणार नाही. कारण आता काम करणाऱ्यांना महत्त्व नाही, तर चमचेगिरी करणाऱ्यांना अधिक महत्त्व आहे,” असा आरोपही राणीने केला.
-
लोक सध्या कंटेंट खूप चांगला येतोय असं म्हणत असले तरी दर्शक चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येत नसतील तर तो कंटेंट काय कामाचा? असा सवालही राणीने उपस्थित केला.
-
राणी चॅटर्जीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात अनेकजण तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
-
राणी चॅटर्जी भोजपुरी इंडस्ट्रीतील बेधडक नाव आहे. आपली मतं सार्वजनिकपणे व्यक्त करण्यासाठी तिची ओळख आहे.
-
राणी तिच्या अभिनयासोबतच डान्ससाठी देखील ओळखली जाते.
-
राणी चॅटर्जी आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत घेताना दिसते.
-
राणी चॅटर्जी नेहमी तिच्या व्यायामाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
-
या फोटोवर चाहत्यांच्या प्रशंसेसोबतच तिला ट्रोलर्सच्या टीकेचाही सामना करावा लागतो. मात्र, राणी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देते.
-
राणी चॅटर्जी भोजपुरी इंडस्ट्रीमधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
तिने २००४ मध्ये आपल्या चित्रपट सृष्टीतील करियरला सुरुवात केली आणि नंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. (सर्व फोटो सौजन्य – राणी चॅटर्जी इंस्टाग्राम)
Indus Waters Treaty suspension: “पाकिस्तानला हे परवडणारं नाही”; पाकिस्तानातील तज्ज्ञ सांगताहेत, असे का?