-
प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके यांचं काल (३१ मे) कोलकात्यामध्ये निधन झालं.
-
लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
-
परंतु, रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. ते ५३ वर्षांचे होते.
-
ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
-
केके यांचं पूर्ण नाव कृष्णकुमार कुन्नथ असे आहे. त्यांचा जन्म दिल्लीतील मल्याळी कुटुंबात झाला होता.
-
त्यांनी जवळपास ५०० हून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे.
-
केके यांच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरश: वेड करून सोडलं होतं.
-
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘माचिस’ या चित्रपटातील ‘छोड आये हम’ या गाण्याला त्यांनी आवाज दिला होता.
-
लोकप्रिय गायक ए.आर.रहमान यांनी संगीत दिलेलं हे गाणं सुपरहिट ठरलं होतं.
-
यानंतर त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात गायलेलं ‘तडप तडप के इस दिल’ या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं होतं.
-
या गाण्यामुळे केके यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
-
‘तडप तडप’ या गाण्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
-
‘यारों ये दोस्ती बडी हि हसीन है’ , ‘हम रहे या ना रहे कल’, ‘तू आशिकी है’, ‘तू ही मेरी शब है’ ही त्यांची गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर असतात.
-
आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या केके यांच्यासाठी एका संगितकाराला गाण्याचे बोल बदलावे लागले होते.
-
केके यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
-
एका नवख्या संगितकाराने केके यांना गाण्याची ऑफर दिली होती.
-
केके यांनी जेव्हा गाणं गायला सुरुवात केली तेव्हा त्यांना गाण्याचे बोल अर्धवट वाटल्यामुळे गाणं मध्येच थांबवून ते निघून गेले.
-
नंतर संगितकाराने केके यांना फोन करून गाण्याचे बोल बदलले आहेत, असे सांगितले.
-
केके यांना गाणं गाण्यासाठी येण्याची विनंतीही संगितकाराने केली.
-
संगितकाराचा पहिलाच चित्रपट असल्याने मी ते गाणं गायलं, असं केके यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.
-
यानंतर मात्र अशी कोणतीही गाणी गायली नसल्याचा खुलासा केके यांनी मुलाखतीत केला होता.
-
वाढदिवस किंवा लग्नसोहळ्यात केके यांनी कधीही गाणं गायलं नाही.
-
एक कोटी रुपये दिले तरी अशा पार्टीमध्ये गाणं गाणार नसल्याचं त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
-
(सर्व फोटो : केके/ इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…