-
अभिनेता बॉबी देओलची सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज ‘आश्रम’चा तिसरा भाग येत्या ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलनं ‘बाबा निराला’ ही भूमिका साकारली असून प्रेक्षकांनी या भूमिकेचं बरंच कौतुकही केलं आहे.
-
‘आश्रम’ वेब सीरिजमध्ये बॉबी देओल खलनायकी भूमिकेत दिसला असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो खूपच शांत आणि रोमँटीक आहे.
-
बॉबी देओल पत्नीला स्वतःची लाइफ लाइन मानतो आणि याचा उल्लेख त्याने बऱ्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.
-
नुकताच बॉबी देओलनं त्याच्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी त्यानं पत्नीसोबतचे रोमँटीक फोटोही शेअर केले.
-
बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या यांचं लग्न १९९६ मध्ये झालं असून त्यांना आर्यमन आणि धर्म ही दोन मुलं देखील आहेत.
-
अनेक मुलाखतींमध्ये बॉबी देओलनं पत्नीवरील प्रेम व्यक्त करतानाच ती त्याची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टिम असल्याचंही म्हटलं आहे. बॉबीला डिप्रेशनमधून बाहेर येण्यासही तिने मदत केली होती.
-
बॉबी देओल नेहमीच पत्नी तान्यासोबतचे रोमँटीक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतो. ज्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळताना दिसते.
-
दरम्यान सध्या प्रेक्षकांना बॉबी देओलच्या ‘आश्रम ३’बाबत बरीच उत्सुकता आहे. त्याची ही वेब सीरिज सुपरहिट राहिली आहे. (फोटो- बॉबी देओल इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख