-
बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींची लाइफस्टाइल हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घ्यायला आवडते. (फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेवरून त्यांची ब्रॅण्ड व्हॅल्यू ठरवली जाते. (फोटो : हृतिक रोशन/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड कलाकार असो अथवा क्रिकेटर देशातील सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अनेक सेलिब्रिटींनी ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या बाबतीत हॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकलं आहे. (फोटो : दीपिका पदुकोन/ इन्स्टाग्राम)
-
‘डफ अॅण्ड फेल्प्स’ साइटने नुकतंच देशातील टॉप १० सेलिब्रिटींच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूबाबत माहिती दिली आहे. (फोटो : अमिताभ बच्चन/ इन्स्टाग्राम)
-
यानुसार टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत दोन क्रिकेटर्सचाही समावेश आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन या यादीत दहाव्या स्थानी आहे. (फोटो : हृतिक रोशन/ इन्स्टाग्राम)
-
हृतिकची ब्रॅण्ड व्हॅल्यू ३७६ कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : हृतिक रोशन/ इन्स्टाग्राम)
-
टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत नवव्या स्थानी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आहे. (फोटो : आयुषमान खुराना/ इन्स्टाग्राम)
-
आयुषमानची ब्रॅण्ड व्हॅल्यू ३८२ कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : आयुषमान खुराना/इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. (फोटो : सलमान खान/ इन्स्टाग्राम)
-
४०० कोटी रुपये इतकी सलमानची ब्रॅण्ड व्हॅल्यू आहे. (फोटो : सलमान खान/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोन या यादीत सातव्या स्थानी आहे. (फोटो : दीपिका पदुकोन/ इन्स्टाग्राम)
-
सलमानप्रमाणेच दीपिकाची ब्रॅण्ड व्हॅल्यूही ४०० कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : दीपिका पदुकोन/ इन्स्टाग्राम)
-
टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत बिग बी अमिताभ बच्चन सहाव्या क्रमाकांवर आहेत. (फोटो : अमिताभ बच्चन/ इन्स्टाग्राम)
-
बिग बींची ब्रॅण्ड व्हॅल्यू ४२० कोटी रुपये आहे. (फोटो : अमिताभ बच्चन/ इन्स्टाग्राम)
-
भारताचा माजी कर्णधार क्रिकेटर महेद्रसिंह धोनीने टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत बिग बींना मागे टाकलं आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत धोनी पाचव्या स्थानावर असून त्याची ब्रण्ड व्हॅल्यू ४७५ कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
वेगवेगळ्या भूमिका साकारून अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या यादीत चौथ्या स्थानी आहे. (फोटो : आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
आलियाची ब्रॅण्ड व्हॅल्यू ५२८ कोटी रुपये आहे. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. (फोटो : अक्षय कुमार/ इन्स्टाग्राम)
-
अक्षय कुमारची ब्रॅण्ड व्हॅल्यू तब्बल एक हजार कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : अक्षय कुमार/ इन्स्टाग्राम)
-
टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दुसऱ्या क्रमाकांवर आहे. (फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
रणवीरची ब्रॅण्ड व्हॅल्यू १ हजार २०० कोटी रुपये आहे. (फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीने मैदानाप्रमाणेच इथेही धुवांधार खेळी केली आहे. (फोटो : विराट कोहली/ इन्स्टाग्राम)
-
टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी असून त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू तब्बल १ हजार ४०० कोटी इतकी आहे. (फोटो : विराट कोहली/ इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”