-
प्रविण तरडे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित ‘सरसेनापती हंबीरराव’ या बहुचर्चित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती म्हणून कारभार पाहिलेले हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
-
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे.
-
चित्रपटातील कलाकारांचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात अभिनेता शुभांकर एकबोटे याने ‘धनाजी जाधव’ ही भूमिका साकारली आहे.
-
शुभांकरने त्याच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे.
-
शुभांकरने नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
-
‘मंत्र’ या चित्रपटातून शुभांकरने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
-
यानंतर अभिनेत्री धनश्री काडगावकरसोबत ‘चिठ्ठी’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्याला मिळाली.
-
‘धर्मवीर’ या बहुचर्चित चित्रपटातही शुभांकर झळकला आहे.
-
शुभांकर दिवंगत मराठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे.
-
अश्विनी यांनी अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
-
त्या उत्तम नृत्यांगणादेखील होत्या.
-
त्या उत्तम नृत्यांगणादेखील होत्या.
-
त्या उत्तम नृत्यांगणादेखील होत्या.
-
त्या उत्तम नृत्यांगणादेखील होत्या.
-
आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुंभाकरदेखील अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे.
-
(सर्व फोटो : शुभांकर एकबोटे/ इन्स्टाग्राम)
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण