-
मानुषी छिल्लर पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि तीही एका ऐतिहासिक चित्रपटाद्वारे. हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची अभिनेत्री आतुरतेने वाट पाहत आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मानुषीने साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्याचे चाहते कौतुक करत आहेत.
-
राणी कलर व गोल्डन बॉर्डर असलेल्या सिल्क साडीमध्ये मानुषी छिल्लर हिचे मनमोहक सौंदर्य आणि साधेपणा तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत असलेल्या मानुषी छिल्लरचे हे फोटो आणि यातील मनमोहक हास्य चाहत्यांना इतके आवडले आहे की ते कमेंट सेक्शनमध्ये तिची जोरदार प्रशंसा करत आहेत.
-
मानुषी छिल्लर, अक्षय कुमार, डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी राय बुधवारी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पिथोरा किल्ल्यावर पोहोचले होते आणि सम्राट पृथ्वीराज यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली होती. मानुषीने हे फोटोशूट दिल्ली दौऱ्यातच केले आहे.
-
यशराज फिल्म्सनेही पहिल्यांदाच मनोरंजनाने परिपूर्ण असा ऐतिहासिक चित्रपट बनवला आहे. या ऐतिहासिक चित्रपटाला घेऊन मानुषी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळतंय.
-
तसेच अभिनेता अक्षय कुमारसोबतच्या तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल मानुषी छिल्लर खूप उत्सुक आहे.
-
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
‘सम्राट पृथ्वीराज’चे स्टार्स मोठ्या उत्साहात या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. दरम्यान आज प्रदर्शित होणाऱ्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात अक्षय कुमार, मानुषी छिल्लरशिवाय सोनू सूद, संजय दत्त यांसारखे दिग्गज कलाकारही दिसणार आहेत.
-
‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट आज देशभरातील सुमारे चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. (फोटो: manushi_chhillar/ instagram)

Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना