-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
-
यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला हा चित्रपट गेले अनेक दिवस नावामुळे चर्चेत होता.
-
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं नाव बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ असं करण्यात आलं.
-
या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
-
अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटात सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली आहे.
-
‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाद्वारे २०१७ ची ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
मानुषी छिल्लर चित्रपटात ‘राजकुमारी संयुक्ता’ या भूमिकेत दिसणार आहे.
-
चित्रपटाप्रमाणेच कलाकारांनी घेतलेल्या मानधनाची देखील बरीच चर्चा होताना दिसत आहे.
-
अभिनेता मानव वीज ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात ‘मोहम्मद गोरी’ भूमिकेत आहे.
-
रिपोर्टनुसार, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटासाठी मानव वीजने १० लाख रुपये घतले असल्याची माहिती आहे.
-
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
‘काका कान्हा’ या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे.
-
ही भूमिका साकारण्यासाठी त्याने पाच कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे.
-
अभिनेता सोनू सूदही चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
-
‘चांदबराय’ ही भूमिका सोनू सूदने साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी सोनू सूदने तीन कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री मानुषी छिल्लरने ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटासाठी १ कोटी रुपये घेतले आहेत.
-
बॉलिवूड कलाकारांची तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते.
-
सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत अक्षय कुमारला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
-
या चित्रपटासाठी अक्षय कुमारने सगळ्यात जास्त मानधन घेतले आहे.
-
सम्राट पृथ्वीराज चौहान साकारण्यासाठी अक्षय कुमारने तब्बल ६० कोटी रुपये मानधन घेतले आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, यशराज फिल्म्स/ इन्स्टाग्राम)

Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना