-
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांचा‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे.
-
रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शनमुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक करताना दिसत आहे.
-
या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
-
हंबीरराव यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली.
-
या भव्य ऐतिहासिक चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्री श्रुती मराठे हिने या चित्रपटात ‘महाराणी सोयराबाई’ ही भूमिका साकारली आहे.
-
नुकतंच श्रुतीने या चित्रपटातील ‘महाराणी सोयराबाई’यांच्या भूमिकेत असणारे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत ती अगदी पारंपारिक वेषात पाहायला मिळत आहे.
-
या फोटोला कॅप्शन देताना तिने ‘महाराणी सोयराबाई’असे म्हटले आहे.
-
श्रुतीच्या या फोटोवर अभिनेते प्रवीण तरडे यांनीही कमेंट केली आहे.
-
“श्रुती तू अप्रतिम काम केलंयस”, असे प्रवीण तरडे यांनी म्हणत तिचे कौतुक केले आहे.
-
त्यावर प्रतिक्रिया देताना श्रुतीनेही ‘धन्यवाद, तू मला माझं सर्वोत्कृष्ट देण्यासाठी नेहमी मदत केलीस’ असे म्हटले आहे.
-
तिच्या या फोटोंचे आणि भूमिकेचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत.
-
या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिला प्रोत्साहन दिले आहे.
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य