-
विनोदी अभिनयशैलीने मराठी चित्रपटसृष्टीवर अभिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस.
-
‘विनोदाचा सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.
-
अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटांप्रमाणेच आपल्या अभिनयाच्या जादूने हिंदी चित्रपटातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
अभिनय आणि विनोदाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडलं.
-
सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला.
-
‘अशी ही बनवाबनवी’, ‘धोबीपछाड’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘चंगू मंगू’, ‘धुमधडाका’, ‘जंमत गंमत’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ असे एक सो एक चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले.
-
‘कोयला’, ‘सिंघम’, ‘जोरू का गुलाम’, ‘जोडी नंबर वन’, ‘घर परिवार’, ‘बडे घर की बेटी’ या चित्रपटातील भूमिकांनी अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
-
वेगवेगळ्या भूमिकांप्रमाणेच चित्रपटातील त्यांचे अनेक डायलॉग आजही तितकेच लोकप्रिय आहेत.
-
मग तो ‘धुमधडाका’ चित्रपटातील ‘व्याख्या विखी वुखू’ हा डायलॉग असो अथवा ‘अशी ही बनवाबनवी’ मधील ‘नवऱ्याने टाकलंय तिला’ असो.
-
आजही अशोक सराफ यांचे हे डायलॉग पोट धरून हसायला भाग पाडतात.
-
अशोक सराफ यांचा असाच एक गाजलेला डायलॉग म्हणजे ‘हा माझा बायको पार्वती’ .
-
‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तितकाच आवडीचा आहे.
-
एका मुलाखतीदरम्यान या डायलॉगमागचा किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला होता.
-
चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये हा डायलॉग लिहिलेला नव्हता.
-
अभिनेता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची ऑनस्क्रिन प्रमाणेच पडद्यामागेही चांगली मैत्री होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
-
अशोक सराफांना लक्ष्मीकांत बेर्डे यांना ‘हा बघ’ असं म्हणायची सवय होती.
-
चित्रपटात स्त्रीची भूमिकेत साकारणाऱ्या आणि आपली बायको बनलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना शूटिंग दरम्यान अशोक सराफ ‘ही’ न म्हणता ‘हा माझा बायको पार्वती’ असं म्हणाले.
-
अशाप्रकारे चित्रपटातील ‘हा माझा बायको पार्वती’ या मजेशीर डायलॉगचा जन्म होऊन तो लोकप्रिय झाला.
-
अशोक सराफ यांचा ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो.
-
गेली अनेक दशकं प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या विनोदाच्या या सम्राटाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-
(सर्व फोटो : निवेदिता सराफ/ इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”