-
Ashok Saraf Birthday Special : मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे.
-
अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ.
-
आज इंडस्ट्रीमध्ये त्यांना ‘अशोक मामा’ म्हणूनच ओळखले जाते.
-
अशोक सराफ यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
-
पण अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे शर्टाचे पहिले बटण कायम उघडे असायचे.
-
या मागचे कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
-
अशोक सराफ यांनी स्वत: यामागचे कारण सांगितले आहे.
-
अशोक सराफ यांनी लोकसत्ता डॉट कॉमच्या ‘डिजिटल अड्डा’ या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
-
दरम्यान त्यांना अनेक चित्रपटांमध्ये शर्टाचे पहिले बटण कायम उघडे का असायचे? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले होते.
-
‘शर्टाचे पहिले बटण बंद केले तर सगळा अभिनय माझ्या गळ्याशी यायचा. म्हणून मी उघडं ठेवायचो. त्यानंतर काही वर्षे मी स्टाइल म्हणून ते ठेवलं होते आणि त्यावेळी ती स्टाइल देखील होती’ असे मजेशीर उत्तर अशोक मामांनी दिले होते.
-
‘विनोदाचा सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.
-
आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केले.
-
वयाच्या ७५ व्या वर्षीसुद्धा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
-
अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’