-
विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते.
-
मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे.
-
अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
आजही सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांना ‘अशोक मामा’ याच नावाने हाक मारतात.
-
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.
-
या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्याकाळात फार गाजला होता.
-
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही.
-
अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता या अवघ्या ६ वर्षांच्या होत्या.
-
अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती.
-
निवेदिता यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख अशोक सराफ यांच्यासोबत करुन दिली होती.
-
त्यानंतर निवेदिता यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
अशोक सराफ आणि निवेदिता यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले.
-
पण ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा चित्रपट त्यांच्यासाठी खास ठरला.
-
या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
पण निवेदिता यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते.
-
‘आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये’, अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यामुळे या लग्नाला चांगलाच विरोध झाला.
-
पण निवेदिता यांची मोठी बहीण डॉ मीनल परांजपे यांनी पुढाकार घेत या लग्नासाठी कुटुंबाकडून परवानगी मिळवली.
-
त्यानंतर अशोक सराफ आणि निवेदिता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधीवत लग्न केले.
-
या ठिकाणी लग्न करण्यामागे त्यांची दोन कारणे होती. पहिले म्हणजे मंगेशी हे सराफ यांचे कुलदैवत होते
-
तर दुसरे म्हणजे याच मंदिरामध्ये या दोघांनी प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यामुळे याच ठिकाणी लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते.
-
त्यांचे लग्न अगदी साधेपणाने पार पडले. मात्र त्यांच्या लग्नाची बातमी सर्व ठिकाणी व्हायरल झाली होती.
-
लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ याच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली.
-
तर अशोक सराफ यांनी अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करत अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
-
(सर्व फोटो – निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”