-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात अक्षयसोबत माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसोबत दिसत आहे. हा चित्रपट सिनेगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
-
अक्षय कुमार हा असा अभिनेता आहे जो एका वर्षात ४ ते ५ चित्रपट करतो.
-
खिलाडी कुमार हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.
-
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना संपूर्ण चित्रपटासाठी जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त पैसे अक्षय कुमार एका जाहिरातीसाठी जास्त पैसे घेतो.
-
अलीकडे अक्षय कुमार तंबाखूच्या जाहिरातींमुळे चर्चेत आला होता. यानंतर अक्कीने तंबाखूच्या या जाहिरातीतून माघार घेतली.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार प्रत्येक जाहिरातीसाठी ६ ते ७कोटी रुपये घेतो.
-
अक्षयकडे फेस वॉश, परफ्यूम, क्रीम, शॅम्पू-कंडिशनर आणि केसांच्या तेलाच्या जाहिराती आहेत.
-
या शिवाय अक्षय सरकारी जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो.
-
अक्षय हा देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.
-
अक्षय त्याच्या फीमुळे अनेकदा चर्चेत असतो.
-
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयने त्याच्या नवीन चित्रपटासाठी १०० कोटींहून अधिक रुपये मानधन म्हणून घेतले आहेत.
-
अक्षयची कमाई त्याला बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक बनवते.
-
फोर्ब्सनुसार अक्षय कुमारची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे. १०० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसलेल्या अक्षयची एकूण संपत्ती २०५० कोटी रुपये आहे, तर अभिनेत्याकडे ११ लक्झरी वाहने आणि बाईक देखील आहेत.
-
अभिनेता त्याच्या कुटुंबासह जुहू येथील समुद्र किणाऱ्यासमोर असलेल्या बंगल्यात राहतो.
-
एका अहवालानुसार, अक्षयची जुहूची संपत्ती जवळपास ८० कोटी रुपयांची आहे.
-
याशिवाय, अक्षयकडे खार पश्चिम येथे एक आलिशान अपार्टमेंट देखील आहे, ज्याची किंमत सुमारे ७.८ कोटी आहे.
-
२०१७ मध्ये त्यांनी अंधेरीमध्ये सुमारे १८ कोटी रुपये किंमतीचे चार फ्लॅट खरेदी केले होते. (All Photo Credit : Akshay Kumar Instagram)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई