-
व्हिजे व प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकर तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
अनुषानं तिच्या इन्स्टाग्रामवर एका छोट्या मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
-
त्यानंतर तिनं मुलीला दत्तक घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता अनुषानं स्पष्टीकरण देत ती तिची खरी मुलगी नसल्याचं म्हटलं आहे.
-
सोशल मीडियावर अनुषानं मुलीला दत्तक घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ‘ही माझी खरी मुलगी नाही’ असं म्हणत अनुषानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “सर्वांनी खूप भरूभरून प्रेम दिलं. हे खूपच प्रेमळ आणि गोड आहे. पण ती माझी खरी मुलगी नाही तर माझी गॉड डॉटर आहे. जी माझी आहे असं मी म्हणू शकते.”
-
याशिवाय अनुषानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर आणखी एक पोस्ट शेअर करत त्या चिमुकलीच्या खऱ्या आईविषयी सांगितलं आहे.
-
अनुषानं लिहिलं, “चिमुकलीची खरी आई झोआ आणि आजी संगीता. मी तिची गॉडमदर आहे. म्हणजेच जेव्हा माझी मैत्रीण झोआनंतर सहाराला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी कायम तिच्यासोबत असेन. त्यामुळे ती मला माझ्या मुलीसारखी आहे. पण ती माझी खरी मुलगी नाही.”
-
दरम्यान अनुषानं अद्याप लग्न केलेलं नाही. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
अनुषा दांडेकर एक उत्तम होस्ट, गायिका आणि व्हिजे देखील आहे. एवढंच नाही तर ती एक बिझनेस वूमनही आहे.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल