-
टीव्ही मालिकेत नागिणीची (TV Show Naagin) भूमिका केलेली अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या आपल्या मैत्रिणींसोबत तुर्कीत सहलीचा आनंद घेत आहे.
-
या सहलीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मौनी रॉय सध्या तुर्कीतील इस्तांबूलमध्ये आहे.
-
या ठिकाणी मौनी आपल्या जवळच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वीच मौनीने सोशल मीडियावर आपल्या मैत्रिणींसाठी जीवही देऊ शकते अशी प्रतिक्रिया दिली होती.
-
आता सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंवरून मौनी आपल्या त्याच जवळच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवताना दिसत आहे. मौनी रॉयच्या जवळच्या मैत्रिणींच्या यादीत मंदिरा बेदीचं देखील नाव आहे. असं असलं तरी मंदिरा मौनीसोबत या सहलीत नाही.
-
या सहलीच्या फोटोंमध्ये काही फोटो मौनीचे एकटीचे देखील आहेत. यात ती कॉफी पिताना दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये मौनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे.
-
नुकतीच मौनी ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या टीजरमध्ये देखील दिसली होती. त्यामुळे मौनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (All Photos: Mouni Roy Instagram )

Ashish Shelar : “राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते ते आता संपले…”, आशिष शेलार यांचं वक्तव्य