-
बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने अलिकडेच ५० वा वाढदिवस साजरा केला.
-
करणने त्याच्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म स्टुडिओमध्ये जंगी पार्टी दिली होती.
-
या बर्थडे पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
पार्टीदरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांच्यासह इतर अनेक सेलिब्रेटींनी करण जोहरच्या बर्थडे पार्टीला उपस्थिती दर्शविली होती.
-
मात्र, या पार्टीतील तब्बल ५०-५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
त्यामुळे करण जोहरची बर्थडे पार्टी करोनाचा हॉटस्पॉट ठरल्याचं बोललं जात आहे.
-
पार्टीनंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
परंतु, शाहरुख खानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेदेखील पार्टीला हजेरी लावली होती.
-
अक्षय कुमारही पार्टीनंतर करोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला देखील करोनाची लागण झाली आहे.
-
पती विकी कौशलसोबत कतरिना पार्टीत सहभागी झाली होती.
-
पार्टीनंतर बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर यालाही करोनाची लागण झाली आहे.
-
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनही करोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
-
करण जोहरच्या बर्थडे पार्टीत कार्तिक सहभागी झालेला नव्हता.
-
परंतु, अभिनेत्री कियारा अडवाणी या बर्थडे पार्टीदरम्यान दिसली होती.
-
कार्तिक आणि कियारा त्यांच्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान संपर्कात आले होते.
-
कियाराच्या संपर्कात आल्यामुळे कार्तिकला करोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, या पार्टीनंतर करण जोहरच्या मित्रपरिवारातील बऱ्याच लोकांना करोनाचं संक्रमण झालं आहे.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल