-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं.
-
सुरुवातीपासूनच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती.
-
मालिकेतील यश-नेहाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे यशची भूमिका साकारत आहे.
-
तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मालिकेत नेहाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
-
या मालिकेतील छोट्या परीचा अभिनय प्रेक्षकांना विशेष भावतो.
-
मालिकेत बालकलाकार मायरा वायकूळ परीच्या भूमिकेत आहे.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत आता लवकरच यश आणि नेहा यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे.
-
सगळे गैरसमज दूर झाल्यावर आजोबांनी यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी दिली आहे.
-
त्यामुळे आता मालिकेत यश-नेहाचा लग्नसोहळा अगदी धूमधडाक्यात पार पडताना दिसणार आहे.
-
यशवर्धन चौधरीचं लग्न असल्यामुळे या विवाहसोहळ्याचा थाट देखील तितकाच मोठा असणार आहे.
-
शिवाय लग्नसोहळ्यातील कार्यक्रमदेखील अगदी दिमाखात पार पडणार आहेत.
-
या आठवड्यात प्रेक्षकांना यश आणि नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत असे लग्नसोहळ्यातील कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील यश-नेहाच्या साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत.
-
साखपुड्यासाठी नेहाने खास हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
चांदीच्या दागिण्यांनी साज करत नेहाने मराठमोळा लूक केला आहे.
-
केसांत गजरा माळल्यामुळे नेहाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
यश-नेहाच्या साखरपुड्यातील खास क्षण.
-
लाडक्या परीने साखरपुड्यासाठी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
यशने फिकट पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला असून त्यावर डिजायनर जॅकेट घातले आहे.
-
यश-नेहाच्या विवाहसोहळ्यातील कार्यक्रमांमध्ये अनेक रंजक वळणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
-
यश आणि नेहाच्या साखरपुड्यातही एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे.
-
साखरपुड्याच्या फोटोंमध्ये यशच्या हातात एक नाही तर चक्क दोन अंगठ्या आहेत.
-
या ट्विस्टमागील उलगडा मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा