-
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
-
‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते.
-
या पत्रानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
-
परंतु, या आधीही २०१८ मध्ये सलमानला अशाचप्रकारे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
-
मुंबई पोलिसांना आलेल्या फोनवर ‘सलमान खानला मारले जाईल’ असे सांगण्यात आले होते.
-
केवळ सलमान खानच नाही तर बॉलिवूडमधील अशा अनेक सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
-
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतलादेखील मारण्याची धमकी देण्यात आली होती.
-
कंगनाने याबद्दल पोस्ट करत मी अशा धमक्यांना घाबरत नसल्याचं सांगितलं होतं.
-
याविरुद्ध तिने हिमाचल प्रदेशातील पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदेखील दाखल केली होती.
-
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा फोन मुंबई पोलिसांना आला होता.
-
किंग खान शाहरुखला गेली अनेक वर्ष जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.
-
शाहरुखच्या मन्नतबाहेरदेखील बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन करण्यात आला होता.
-
‘सत्यमेव जयते’ या शोच्या पहिल्या सीझननंतर अभिनेता आमिर खानला देखील धमकीवजा फोन आला होता.
-
एका गॅंगस्टरने बॉलिवूड गायक अरिजित सिंगला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
-
अरिजितच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी कमी पैसे आकारण्यात यावे, यासाठी गॅंगस्टरने फोनद्वारे धमकी दिली होती.
-
अरिजितप्रमाणेच लोकप्रिय गायक सोनू निगमलाही गॅंगस्टरकडून धमकीचा फोन आला होता.
-
बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने एका मुलाखतीदरम्यान जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खुलासा केला होता.
-
बॉलिवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांना देखील धमकीवजा फोन आला होता.
-
चित्रपटाच्या यशानंतर अधिक पैसे देण्याची मागणी गॅंगस्टरकडून करण्यात आली होती.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
-
गॅंगस्टर रवी पुजारीने अक्षय कुमारला धमकी दिल्यानंतर त्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली होती. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख