-
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांचा बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २७ मेला सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्याचा सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
-
अभिनेता प्रविण तरडे यांनी या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली आहे.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा दुहेरी भूमिकेत आहे.
-
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेने चित्रपटात महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारली आहे.
-
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.
-
चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत.
-
सोशल मीडियावरही ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची चर्चा आहे.
-
चित्रपटातील कलाकारांचे कौतुक होताना दिसत आहे.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरही जादू पाहायला मिळत आहे.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८.७१ कोटींचा गल्ला जमवला.
-
प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच आहे.
-
अकरा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
(सर्व फोटो : सरसेनापती हंबीरराव, प्रविण तरडे/इन्स्टाग्राम)
“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक