-
बॉलिवूड अभिनेत्री सोनक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल मागच्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे.
-
सोनाक्षी आणि जहीर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून होताना दिसत आहेत.
-
मात्र दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.
-
आता सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल जहीर यांच्या नात्याचा अखेर खुलासा झाला आहे.
-
इक्बालनं सोशल मीडियावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यू’ म्हणत रिलेशनशिपच्या चर्चांना पुष्टी दिली आहे.
-
जहीर इक्बालनं त्याच्या इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं सोनाक्षीवर प्रेम करत असल्याचं मान्य केलंय.
-
जहीर इकबालचा जन्म १० डिसेंबर १९८८ ला मुंबईत श्रीमंत कुटुंबात झाला आहे.
-
जहीरच्या कुटुंबाचा दागिन्यांचा व्यापार आहे.
-
चित्रपटसृष्टीचा आणि जहीरच्या कुटुंबाचा तसा फारसा संबंध नाही.
-
पण सलमान खान आणि जहीरचे वडील इकबाल रत्नासी हे लहानपणापासूनचे मित्र आहेत.
-
त्यामुळे बॉलीवूडशी त्याच एक खास नात आहे असं म्हणायला हरकत नाही.
-
सलमान बहिण अर्पिताच्या लग्नात जहीरला भेटला.
-
सलमानला त्याच्यात अभिनेत्याचे गुण दिसले आणि त्याने जहीरला ‘नोटबूक’ चित्रपटातून लॉन्च केलं.
-
या चित्रपटात, झहीर दिवंगत दिग्गज अभिनेत्री नूतनची नात प्रनूतन बहल हिच्यासोबत दिसला होता.
-
झहीरची बहीण सनम रतनसी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे.
-
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल लवकरच ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
-
पण तुम्हाला माहित आहे का झहीर सोनाक्षीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी दाक्षिणात्य अभिनेत्री दीक्षा सेठ आणि बॉलिवूड अभिनेत्री सना सईदसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते.
-
आता ते दोघं लवकरच लग्नबंधनात अडणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहेत. (All Photo Credit : Zaheer Iqbal Instagram)
Aajche Rashi Bhavishya : चार चौघात सन्मान ते प्रचंड धनलाभ; तुमच्या राशीसाठी शिवयोग ठरणार का शुभ? वाचा राशिभविष्य