-
कलाकार हे कायम चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.
-
एकेकाळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील चर्चेत होती. तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते.
-
आज ८ जून रोजी शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया शिल्पा शेट्टीच्या अफेअर विषयी..
-
शिल्पा शेट्टीचे नाव एकेकाळी बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारशी जोडले गेले होते.
-
त्यावेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
-
नंतर एका मुलाखतीमध्ये शिल्पाने अक्षयने तिला फसवले असल्याचा खुलासा केला होता.
-
१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाल्याचे म्हटले जाते.
-
पण २००० मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.
-
ब्रेकअपनंतर अक्षयने २००१मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केले.
-
दरम्यान, शिल्पाने एका मुलाखतीमध्ये अक्षयसोबतच्या अफेअरवर वक्तव्य केले होते.
-
‘अक्षयने केवळ माझा वापर केला. त्याच्या आयुष्यात जेव्हा दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले. अक्षय केवळ एक असा व्यक्ती आहे ज्याचा मला प्रचंड राग आला आहे. कारण त्याने मला फसवले. अक्षय माझ्यासोबत जसा वागला एक दिवस त्याच्यासोबतही तसेच घडेल’ असे शिल्पा म्हणाली होती.
-
त्यावेळी शिल्पा शेट्टीच्या डोळ्यात पाणी आले होते. (All Photo Credit : Shilpa Shetty Instagram/ Indian Express / Main Khiladi Tu Anari Movie )

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ