-
९०च्या दशकात अभिनयासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस.
-
आकर्षक आणि कमनीय बांध्यासाठी प्रसिद्ध असलेली शिल्पा शेट्टी बॉलीवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहिली आहे.
-
शिल्पाने ‘बाजीगर’ या चित्रपटातून आपल्या कलाविश्वातील कारकीर्दीला सुरूवात केली.
-
‘आग’ या चित्रपटात तिला पहिल्यांदा मुख्य नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
-
‘रिश्ते’, ‘फिर मिलेंगे’, ‘धडकन’ या चित्रपटातील शिल्पाने साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
-
अभिनयासोबतच शिल्पा उत्तम नृत्यांगणादेखील आहे.
-
फिटनेसकडे शिल्पा विशेष लक्ष देताना दिसते.
-
योगा करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शिल्पा सोशल मीडियावरून शेअर करताना दिसते.
-
शिल्पाने २००९ साली उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्नगाठ बांधली.
-
शिल्पा आणि राजला दोन मुलं आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत गाजलेलं प्रेमप्रकरण असो अथवा पती राज कुंद्राचं प्रकरण नेहमीच चर्चेत राहिलेली शिल्पा शेट्टी करोडोंची मालकिण आहे.
-
मुंबईतील जुहू येथे शिल्पाचा आलिशान बंगला आहे.
-
‘किनारा’ असं नाव असलेल्या शिल्पाच्या बंगल्यात जीम, मोठे गार्डन आणि थिएटरदेखील आहे.
-
या बंगल्याची किंमत सुमारे २४ कोटी रुपये इतकी आहे.
-
शिल्पाकडे लक्झरियस गाड्यादेखील आहेत.
-
बीएमडब्ल्यू, लॅम्बोर्गिनी या महागड्या गाड्यांमधून शिल्पा फिरते.
-
या गाड्यांची किंमत ६ कोटींच्या घरात आहे.
-
एका चित्रपटासाठी शिल्पा १-२ कोटी रुपये मानधन घेते.
-
शिल्पा शेट्टी वर्षाला १०-१२ कोटी रुपये कमवत असल्याची माहिती आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी शिल्पा शेट्टी १३४ कोटी रुपये संपत्तीची मालकिण आहे.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, शिल्पा शेट्टी/ इन्स्टाग्राम)

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी