-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान’ मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून रंजक वळणं पाहायला मिळत आहेत.
-
मालिकेतील पल्लवी आणि शांतनू या पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
-
अभिनेता अक्षर कोठारी मालिकेत ‘शांतनू’ हे पात्र साकारत आहे.
-
‘पल्लवी’ची भूमिका अभिनेत्री पूजा बिरारीने साकारली आहे.
-
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे.
-
पल्लवी आणि शांतनूने संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने सप्तपदी घेतल्या आहेत.
-
मालिकेत पल्लवी आणि शांतनूच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे.
-
लग्नातल्या दोघांच्या पारंपरिक लूकला विशेष पसंती मिळत आहे.
-
पल्लवी आणि शांतनू नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
-
पल्लवी- शांतनूच्या आयुष्यात जरी आनंदाचे क्षण आले असले तरी मोठ्या आईच्या मनात मात्र नवं कटकारस्थान सुरू आहे.
-
सहा महिन्यांच्या आत पल्लवीचे सूर्यवंशी घराण्यासोबत असलेले संबंध तोडायला लावण्याची शपथ मोठ्या आईने घेतली आहे.
-
त्यामुळे आता मोठी आई पल्लवीला त्रास देण्यासाठी कोणतं नवं कारस्थान करणार, हे मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे.
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य