-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल आज जाहीर झाला.
-
याच निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटी बारावीत किती गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते यावर एक नजर टाकूया.
-
निखळ हास्य आणि उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा.
-
अभिनेत्री अनुष्का शर्माने बारावीत ८९% गुण मिळवले होते.
-
अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.
-
अभिनेत्री भूमी पेडणेकरने बारावीत ८३% गुण मिळवले होते.
-
बॉलिवूडचा बादशहा, किंग खान या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान.
-
अभिनेता शाहरुख खानने बारावीत ८०.५% गुण मिळवले होते.
-
क्रिती सनॉन ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
अभिनेत्री क्रिती सनॉनने बारावीत ९०% गुण मिळवले होते.
-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
-
अभिनेत्री जान्हवी कपूरने बारावीत ८६% गुण मिळवले होते.
-
श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये पदापर्ण करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली.
-
अभिनेत्री श्रद्धा कपूरने बारावीत ९५% गुण मिळवले होते.
-
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘काबिल’, ‘बाला’सारख्या चित्रपटांमधून नावारूपाला आलेली अभिनेत्री यामी गौतम.
-
अभिनेत्री यामी गौतमने बारावीत ८०% गुण मिळवले होते. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना