-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस.
-
सोनम आई होणार असल्यामुळे हा वाढदिवस तिच्यासाठी खास असणार आहे.
-
सोनम सोशल मीडियावर सक्रिय असून बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे अनेक फोटो शेअर करत असते.
-
कपूर घराण्यात जन्मलेल्या सोनमला कलाविश्वात मात्र फारसं यश मिळवता आलं नाही.
-
स्टार किड असूनही सोनमचं बॉलिवूड करिअर फ्लॉप ठरलं.
-
बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ‘सांवरिया’ चित्रपटातून २००७ साली सोनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
या चित्रपटासाठी सोनमने दोन वर्षात तब्बल ३५ किलो वजन कमी केलं होतं.
-
परंतु, तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला.
-
यानंतर सोनम ‘भाग मिल्खा भाग’, ‘नीरजा’, ‘पॅडमॅन’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘संजू’, ‘रांझणा’ या चित्रपटांतही झळकली.
-
सोनमने जवळपास २० चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, यातील फक्त ५-६ चित्रपटच हिट ठरले आहेत.
-
सोनमला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला चित्रपट दिग्दर्शक व्हायचं होतं.
-
याबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी सोनमचे वडील आणि सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी तिला संजय लीला भन्साळीकडे जाण्याचा सल्ला दिला.
-
परंतु, संजय लीला भन्साळीने सोनमला ‘सांवरिया’मध्ये मुख्य नायिकेची भूमिका दिली.
-
कपूर घराण्यात जन्माला येऊन देखील सोनमने कधी काळी वेटरची नोकरीही केली आहे.
-
सिंगापूरमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या सोनमला एक आठवड्यासाठी का होईना पण वेटरची नोकरी करावी लागली होती.
-
तेव्हा सोनम १५ वर्षांची होती.
-
बॉलिवूड करिअर फ्लॉप ठरल्यानंतर सोनमने २०१८ मध्ये आनंद अहुजासोबत लग्नगाठ बांधली. आता ते आई-बाबा होणार आहेत.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. (सर्व फोटो : सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य