-
अभिनेत्री सोनम कपूरचा आज ३७वा वाढदिवस आहे.
-
फॅशनसेन्समुळे चर्चेत असणाऱ्या सोनमने यापूर्वी अनेक वादग्रस्त विधानं केली. यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
-
२००९मध्ये एका ब्रँडसाठी सोनमने काम केलं. पण त्यापूर्वी सोनमच्या हाती असलेल्या ब्रँडचा चेहरा अभिनेत्री ऐश्वर्या राय होती.
-
यादरम्यान सोनमने म्हटलं होती की, “ऐश्वर्याने माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे. तर मी तिला आंटीच बोलणार ना…”
-
तिच्या या वादग्रस्त विधानामुळे सोनम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.
-
इतकंच नव्हे तर सोनमने अभिनेत्री परिणीतीलाही तिच्या कपड्यांबाबत सल्ला दिला होता.
-
करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सोनमने हजेरी लावली होती. यावेळी सोनमला परिणीती बाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
-
यावेळी ती म्हणाली, “परिणीतीने टाइट कपडे परिधान करु नये.”
-
सोनमचं हे विधान देखील बरंच चर्चेत आलं होतं. (फोटो – फाईल फोटो)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित