-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘बॉस माझी लाडाची’ ही मालिका प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे.
-
या मालिकेतील बॉस आणि मिहीर यांच्यातील शाब्दिक वाद, प्रेमाचं नाटक हे सगळंच बघायला प्रेक्षकांना मजा येत होती.
-
आता हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
मालिकेत मिहीर आणि राजेश्वरी यांच्या लग्नाची सनई वाजणार आहे.
-
छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच बॉस आणि कर्मचारी यांचं लग्न प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
-
बॉस आणि मिहीर यांचं लग्न म्हणजे एक करार असला तरीही इतर लग्नांप्रमाणेच सगळे विधी या विवाहसोहळ्यात पाहायला मिळणार आहेत.
-
समाजमाध्यमांवर तर यांच्या नावाचा ‘माहिराज’ असा हॅशटॅग तयार झाला असून त्यांचे चाहते या लग्नासाठी फारच उत्सुक आहेत.
-
या दोघांनीही मराठमोळं प्री वेडिंग फोटोशूट देखील केलं आहे.
-
नेहेमी पाश्चिमात्य कपड्यांमध्ये दिसणारी बॉस या वेळेस मराठमोळी नऊवारी साडी, मराठमोळे दागिन्यांमध्ये दिसली. तर मिहीरसुद्धा कुर्ता आणि धोतर या पोशाखात दिसला.
-
हर्षे आणि मांजरेकर कुटुंबांत लगीनसराई सुरू आहे.
-
हळद, संगीत, मेहंदी असे सगळे विधी प्रेक्षकांना बॉस माझी लाडाची या मालिकेच्या पुढील काही भागांत पाहायला मिळणार आहेत .
-
बॉसला या सगळ्या गोष्टी आवडत नसल्या तरीही कंपनी वाचवण्यासाठी रीतसर विधिवत लग्न करायला तिने मिहीरला होकार दिला आहे.
-
लग्नासाठी राजेश्वरीने नऊवारी साडी परिधान केली आहे. तर मिहीरने फेटा बांधून पारंपारिक लूक केला आहे.
-
‘माहिराज’च्या विवाहसोहळ्यातील खास क्षण.
-
मिहीर आणि बॉस यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का?,मिहीरची आजी म्हणजेच आऊ लग्नाला मनापासून संमती देणार का?, बॉसचे काका-काकू लग्नात काही गडबड तर करणार नाहीत ना? ,या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या विवाहविशेष भागात पाहायला मिळणार आहेत.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल