-
बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. आज सोनमचा ३७ वा वाढदिवस आहे.
-
सोनम ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.
-
आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने लग्नानंतर ती कोणत्या घरात राहते ते जाणून घेणार आहोत.
-
‘सावरियाँ’ या चित्रपटातून सोनमने कलाविश्वात पदार्पण केलं.
-
सोनम कपूरने सह दिग्दर्शक म्हणून सुरूवातीला काम पाहिले होते.
-
याचं तिला तीन हजार रूपये मानधन मिळाले होते.
-
अनिल कपूर यांची लेक असलेल्या सोनमला सुरुवातीच्या काळात कलाविश्वात फारसं यश मिळालं नाही. मात्र ‘नीरजा’ या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली.
-
८ मे २०१८ रोजी सोनमने आनंद आहुजा याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांनी शीख पद्धत ‘आनंद कारज’ या पद्धतीनुसार लग्न केले.
-
लग्न झाल्यानंतर सोनम आणि तिचा पती आनंद हे लॉकडाऊनमध्ये दिल्लीतील घरात राहत होते आणि आता ते लंडनमधील आलिशान घरात राहतात.
-
सोनम कपूरने Architectural Digest या मासिकासाठी घराचे फोटोशूट केले आहे.
-
यात सोनमच्या घरातील फर्निचर, भिंतीची रंगसंगती, कॉफी टेबल यासह विविध वस्तू पाहायला मिळत आहे.
-
सोनमच्या लंडनच्या घरी ब्राऊंन रंगाचं फर्निचर असून भिंतीवर चित्र काढण्यात आलं आहे.
-
सोनमच्या बेडरूममध्ये निळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
-
सोनमच्या बाथरूमला आलिशान डेकोरेशन करण्यात आले आहे.
-
हॉलवेमध्ये ब्राऊन रंगाचा सुंदर नक्षी काम असलेला दरवाजा आहे.
-
तिच्या घरात आणखी एक बेडरूम असून त्याचं फर्निचर हे पांढऱ्या रंगाचं आहे.
-
सोनमच्या घरात देखील निळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.
-
लॉकडाऊनमध्ये आनंद आणि सोनम दिल्लीत अडकले होते,
-
सोनम आणि आनंद यांच्या दिल्लीतील बेडरूमचं फर्निचर पांढऱ्या रंगाचं आहे.
-
लॉकडाऊनमध्ये आनंद दिल्लीच्या घरातून काम करत होता.
-
या फोटोमध्ये आनंद आणि सोनम दोघंही पुस्तक वाचण्यात व्यस्त आहेत.
-
सोनम स्वत: साठी नेहमीच वेळ काढण्याचा प्रयत्न करते.
-
अभिनयासोबतच सोनमला स्वयंपाक करण्याची आवड असल्याचं दिसून येत आहे. घरातल्यांसाठी स्वयंपाक करताना सोनम.
-
सोनमच्या घरापुढे विस्तीर्ण लॉन आहे.
-
स्टडी रुममध्ये पुस्तकं पाहताना आनंद.
-
आनंदला वेगवेगळ्या शूजची आवड असून त्याने वेगवेगळ्या ब्रॅण्डचे आणि स्टाइलच्या शूजचं कलेक्शन केल्याचं दिसून येत आहे.
-
लॉकडाउनमुळे जीम वगैरे बंद असताना आनंद त्याच्या लॉनमध्ये योगा करताना. (All Photo Credit : Sonam Kapoor Instagram / Architectural Digest India)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”