-
बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंगचा आज ४५वा वाढदिवस.
-
‘ऑंख मारे’, ‘राणी तू में राजा’, ‘आज की पार्टी’ मिका सिंगची गाजलेली गाणी आजही पार्टी आणि कार्यक्रमांत वाजतात.
-
मिका सिंगला स्वयंवराद्वारे लवकरच त्याची दुल्हनियादेखील मिळणार आहे.
-
गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेला मिका सिंग काही वादग्रस्त कारणांमुळे अधिक चर्चेत राहिला.
-
बॉलिवूड अभिनेता सलमान खानप्रमाणेच मिका सिंगही हिट अॅण्ड रन प्रकरणात अडकला होता.
-
मिकाने त्याच्या गाडीने एका रिक्षाला धडक मारली होती. त्यावेळी रिक्षात असलेले लोक जखमी झाले होते.
-
परंतु, नंतर मिकाने आपण गाडी चालवत नव्हतो असे सांगितले होते.
-
मिकाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका डॉक्टरला कानशिलात लगावली होती.
-
डॉक्टरने गैरवर्तन केल्यामुळे कानाखाली मारल्याचा खुलासा मिका सिंगने केला होता.
-
या प्रकरणावरून मिकावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
-
मिकावर लैंगिक शोषणाचा आरोपही करण्यात आला होता.
-
२०१८ मध्ये १७ वर्षीय ब्राझील मॉडेलने मिकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
-
याप्रकरणी दुबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा मिकाला तुरूंगवासही झाला होता.
-
बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला किस केल्यामुळे मिका सिंग सगळ्यात जास्त चर्चेत राहिला होता.
-
२००६ मध्ये मिकाने त्याच्या वाढदिवशी राखीला जबरदस्ती किस केल्याची चर्चा रंगली होती.
-
राखीने मिका विरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली होती.
-
तर, मिकाने त्यावेळी स्पष्ट केले होते की राखीने आधी त्याला किस केले.
-
(सर्व फोटो : मिका सिंग/ इन्स्टाग्राम)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…