-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं.
-
मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका रंजक वळणावर आहे.
-
मालिकेत यश-नेहाच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे.
-
नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला.
-
त्यानंतर यशची बॅचलर पार्टी आणि नेहाच्या मेहंदीचा कार्यक्रमदेखील उत्साहात झाला.
-
आता लवकरच यश-नेहा हळदीच्या रंगात रंगणार आहेत.
-
यश-नेहाच्या लग्नातील हळदीचा शानदार सोहळा प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.
-
नेहाने हळदी सोहळ्यासाठी पिवळ्या रंगाच्या साडी आणि फुलांच्या ज्वेलरीने खास लूक केला आहे.
-
तर यशने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
लाडक्या परीनेही हळदी सोहळ्यासाठी खास लूक केला आहे.
-
हळदी सोहळ्यात नवरदेव यश आणि नवरी नेहा दोन्हीकडून कल्ला असणार आहे.
-
यश-नेहाच्या हळदी सोहळ्यातील खास क्षण.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या लग्न विशेष सप्ताहमध्ये प्रेक्षकांना यश-नेहाच्या विवाहसोहळ्यातील धमाल पाहायला मिळणार आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल