-
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेला ‘भूल भूलैय्या २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
-
‘भूल भूलैय्या’चा सिक्वेल असलेला हा चित्रपट २० मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
प्रदर्शनाच्या २१ दिवासांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘भूल भूलैय्या २’ चित्रपटाची जादू कायम आहे.
-
कार्तिक आणि कियाराला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करताना दिसत आहेत.
-
तर दुसरीकडे बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाला मात्र प्रेक्षकांची फारशी पसंती मिळत नसल्याचं दिसत आहे.
-
३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो चित्रपटगृहात प्रेक्षक नसल्याने अनेक ठिकाणी रद्ददेखील करण्यात आले आहेत.
-
याच चित्रपटातून ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
-
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली होती.
-
परंतु, अपेक्षेला खरा न उतरल्यामुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
-
पहिल्याच दिवशी जवळपास फक्त ११ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले.
-
त्यानंतर विकेण्डला चित्रपटाचे शो हाऊसफुल होतील असे वाटले होते.
-
परंतु, विकेण्डलादेखील हा चित्रपट फारसा चालला नाही.
-
याउलट ‘भूल भूलैय्या २’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १४.११ कोटींची कमाई केली होती.
-
दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ होताना दिसत आहे.
-
अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या तुलनेत ‘भूल भूलैय्या २’ वरचढ ठरला आहे.
-
‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने आत्तापर्यंत ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
-
‘भूल भूलैय्या २’ चित्रपटाने ‘सम्राट पृथ्वीराज’पेक्षा तिप्पटीने कमाई केली आहे.
-
बॉक्स ऑफिसवर ‘भूल भूलैय्या २’ चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण १६३.०३ कोटींचा गल्ला जमवला आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ