-
‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने ७ दिवसांमध्ये फक्त ५५ कोटी रुपयांची कमाई केली.
-
या चित्रपटाचे काही शो रद्द देखील करण्यात आले.
-
कंगना रणौतच्या ‘धाकड’ चित्रपटाची देखील तिच परिस्थिती होती.
-
कंगनाचा चित्रपट पाहण्यासाठी एकही प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये नसल्याने हा चित्रपटाचेही शो रद्द करण्यात आले.
-
पण याउलट मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. अभिनेता प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ चित्रपटाने कोट्यावधी रुपयांची कमाई केली.
-
दहा दिवसात या चित्रपटाने १८.०३ कोटींचा गल्ला जमवला.
-
अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटानेही विक्रमी कमाई केली.
-
या ऐतिहासिक चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली.
-
एकूणच काय तर बिग बजेट चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. (फोटो – फाईल फोटो)
IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO