-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
-
मालिकेतील यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
तसंच परीच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता जवळ आला आहे.
-
यश आणि नेहा लग्नबंधनात अडकून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
-
मालिकेत यश आणि नेहा यांच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांची धामधूम पाहायला मिळत आहे.
-
यश-नेहाचा विवाहसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे.
-
यश-नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजा मस्ती तर प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
-
पण आता यश आणि नेहाचा शानदार लग्नसोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
-
लग्नसोहळ्यासाठी नेहा आणि यश यांनी खास पोशाख केला आहे.
-
गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये नेहाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.
-
तर यश नवरदेवाच्या पोशाखात राजबिंडासारखा तयार झाला आहे.
-
पण या सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते चिमुकल्या परीने.
-
शरारामध्ये परी खूपच गोड दिसते आहे.
-
यश-नेहाचा दिमाखदार विवाहसोहळा प्रेक्षकांना रविवारी १२ जूनला लग्नविशेष भागात पाहायला मिळणार आहे.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच