-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केले.
-
अंकिता आणि विकी हे ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोचे विजेते ठरले आहेत.
-
अंकिता बद्दल तर सगळ्यांच ठावूक आहे पण विकीबद्दल अनेकांना माहित नाही. आज आपण विकी काय करतो हे जाणून घेणार आहोत
-
अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनशी १४ डिसेंबर रोजी लग्न गाठ बांधली आहे.
-
मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
विकीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
. त्यानंतर त्याने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून (JBIMS) एमबीए केलं.
-
एमबीएची शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने त्याच्या कुटुंबाच्या व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली.
-
लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.
-
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, विकी हा बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक आहे.
-
या ग्रुपचा कोळसा व्यापार, वॉशरी, लॉजिस्टिक, पॉवरप्लांट, रिअल इस्टेट आणि डायमंडमध्ये मोठा व्यवयास आहे.
-
विकीचा कौटुंबिक व्यवसाय हा रिअल इस्टेटमध्येही पसरलेला आहे.
-
महावीर बिल्डर्स अँड प्रमोटर्स असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे.
-
शिवाय, बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचं फर्निचरचं शोरूमही असल्याचं वृत्त आहे.
-
विकीचे वडील विनोद जैन हे बिलासपूरमधील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
-
एवढचं काय तर ते प्री-स्कूलचेही गुंतवणूकदार असल्याचे असंही म्हटलं जातं.
-
विकी हा क्रीडाप्रेमी आहे आणि त्याच्या या क्षेत्रातील आवडीमुळे त्याने त्यातही गुंतवणूक केली आहे.
-
तो बॉक्स क्रिकेट लीग (BCL) संघ, मुंबई टायगर्सचा सहमालक आहे. (All Photo Credit : Ankita Lokhande Instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”