-
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणाबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
-
अभिनेते शक्ती कपूर यांचा हा लेक अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे.
-
मात्र त्याच्या फिल्मी करिअरमध्ये बरेच चढ-उतार आले.
-
सिद्धांतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. ‘भुल भूलैय्या’, ‘भागम भाग’, ‘चुप चुपके’, ‘ढोल’ सारख्या चित्रपटाचं त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं.
-
‘शूट आऊट एट लोखंडवाला’ हा त्याचा अभिनेता म्हणून पाहिला चित्रपट.
-
नंतर सिद्धांतने ‘हसीना पारकर’, ‘जज्बा’, ‘पलटन’, ‘यारम’, ‘हॅलो चार्ली’, ‘भूत-पार्ट वन: द हॉन्टेड शिप’, ‘चेहरे’ सारख्या चित्रपटामध्ये त्याने काम केलं.
-
पण अभिनेता म्हणून त्याला यश मिळालं नाही.
-
बऱ्याचदा तो सहाय्यक अभिनेत्याचीच भूमिका करताना दिसला.
-
वडील शक्ती कपूर यांच्यासारखं नाव कमावण्यात सिद्धांत अपयशी ठरला. ‘चेहरे’ हा त्याचा शेवटचा चित्रपट. सध्यातरी त्याच्या हाती कोणताच चित्रपट नाही. (फोटो – इन्स्टाग्राम)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर