-
छोट्या पडद्यावरील स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते.
-
स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे.
-
स्पृहाने नुकतंच एका मुलाखतीत तिचा पती वरद लघाटे याच्यासोबत पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
-
स्पृहा ही नुकतंच तिचा पती वरदसोबत अनुरुप विवाह संस्थेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होती.
-
यावेळी तिला तिच्या लव्हस्टोरीपासून लग्नापर्यंत अनेक गोष्टी विचारण्यात आल्या. त्यावर तिने भाष्य केले.
-
या मुलाखतीत स्पृहा म्हणाली, “मी आणि वरद कॉलेजमध्ये असताना एका वृत्तपत्राचे कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करायचो. त्यावेळी तिथेच आमची ओळख झाली.”
-
“सुरुवातीला आम्हा दोघांची एकमेकांबद्दलची मत फार बरी नव्हती.”
-
“माझं वरदबद्दलचे पहिले इम्प्रेशन फारच वाईट होतं. मला तो अजिबात आवडला नव्हता.” असे स्पृहा म्हणाली.
-
“त्याला बातम्या दाखवणं, विषय सांगणं हे मला पटायचं नाही”, असे स्पृहाने म्हटले.
-
“तर दुसरीकडे वरदलाही स्पृहा एक वशीला लावून झालेली कॉलेज प्रतिनिधी वाटायची.”
-
“त्यानंतर काही महिन्यांनी आम्हाला जबरदस्ती एका प्रोजेक्टवर काम करावं लागलं. यावेळी मी आणि तो एकत्र दोन महत्त्वाचे विभाग सांभाळत होतो. तेव्हा खरंतर आमची मैत्री घट्ट झाली”, असे स्पृहाने म्हटले.
-
“आम्ही एकमेकांना डेट करायला लागल्यानंतर सुरुवातीलाच आमच्या लक्षात आलं की आमचं हे नातं लग्नापर्यंत टिकेल”, असेही तिने सांगितले.
-
“आम्ही दोघेही गांभीर्याने नात्याकडे बघणारी दोन लोकं होतो. पण आमच्या लव्हस्टोरीमध्ये कोणी कोणाला रोमँटिक प्रपोज केलं नाही”, असे ती म्हणाली.
-
“आम्ही एकमेकांना वेळ दिला. आमच्या नात्यासाठी वेळ घेतला. त्यानंतर पुढील सर्व गोष्टी बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत, हे समजल्यानंतर आम्ही ठरवून लग्नाचा निर्णय घेतला”, असेही तिने सांगितले.
-
स्पृहा आणि वरद यांच्या लग्नाला १३ वर्षे उलटली आहेत. २०१४ मध्ये त्या दोघांनी लगीनगाठ बांधली.
बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी