-
महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे.
-
त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे – वटपौर्णिमा.
-
विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.
-
वटपौर्णिमेच्या व्रतामागे ‘सत्यवान आणि सावित्री’ यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे.
-
ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत.
-
आता हीच कथा प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांमध्ये वटपौर्णिमा या सणाचा विशेष भाग देखील पाहायला मिळेल.
-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
-
नुकतंच या मालिकेत यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला.
-
त्यांचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजा मस्ती तर प्रेक्षकांनी पाहिलीच सोबत यश आणि नेहाचा लग्न सोहळा डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने संपन्न झाला.
-
या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात प्रेक्षकांना नेहा आणि यशची पहिली वटपौर्णिमा पाहायला मिळणार आहे.
-
या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभुदे अशी प्रार्थना करतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का