-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला जात आहे.
-
महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळते.
-
या मालिकेतील अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याचा खऱ्या आयुष्यात साखरपुडा पार पडला आहे.
-
‘नवे लक्ष्य’ या मालिकेत अभिजीत पोलिस इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाड ही भूमिका साकारतो आहे.
-
अभिजीतने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली.
-
११ जून रोजी सेजल वर्देसोबत अभिजीतचा साखरपुडा पार पडला.
-
अभिजीत प्रमाणेच सेजल ही एक उत्तम अभिनेत्री आहे.
-
अभिजीतने ‘बाजी’, ‘साजणा’, ‘बापमाणूस’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
-
अभिजीत-सेजलच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिजीत श्वेतचंद्र / इन्स्टाग्राम)

“बलात्कारासाठी ती स्वतःच जबाबदार”, हायकोर्टाची टिप्पणी; आरोपीला जामीन मंजूर