-
झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे.
-
यासोबतच या मालिकेतील मायरा म्हणजेच परी या चिमुकलीने सर्वांचीच मन जिंकली आहेत.
-
या मालिकेतील सर्वच कलाकार नेहमीच चर्चेत असतात.
-
पण या मालिकेत एक व्यक्तीरेखा तिच्या अभिनयामुळे कायमच चर्चेत असते ती म्हणजे शेफाली.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत शेफाली ही नेहाची सहकारी आणि खास मैत्रीण असल्याचे दाखवण्यात आले आहे.
-
या मालिकेत शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे साकारताना दिसत आहे.
-
अभिनेत्री काजल काटे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
ती नेहमी तिच्या पतीसोबतच विविध फोटो शेअर करताना दिसते
-
नुकतंच त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने तिने लग्नातील एक फोटो शेअर करत आपल्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील शेफाली म्हणजेच काजलचे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाशी खास कनेक्शन आहे.
-
काजलचा पती हा मुंबई इंडियन्स संघाचा फिटनेस कोच आहे.
-
काजलच्या पतीचे नाव प्रतिक कदम असे आहे.
-
काजल हा मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडूंना फिट ठेवण्याचे काम करतो.
-
काजल देखील क्रिकेटची चाहती असून अनेकदा ती मैदानात सामना पाहण्यासाठी जाते.
-
काजल ही मूळची नागपूरची आहे.
-
तिने ‘डॉक्टर डॉन’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिकांमध्येही काम केलं आहे.
-
“माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील ही भूमिका माझ्या करिअरला एक वेगळं वळण देणारी ठरली आहे. या भूमिकेमुळे लोक मला ओळखू लागले आहेत. अनेकजण मला मेसेज, कॉल करून आवर्जून प्रतिक्रिया कळवतात.” अशी प्रतिक्रिया काजलने दिली होती. (सर्व फोटो – काजल काटे/ इन्स्टाग्राम)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?