-
‘पावनखिंड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली.
-
अजय यांना इतिहासाचं प्रचंड वेड आहे. म्हणूनच की काय त्यांनी ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं आहे.
-
बाजीप्रभू यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं अजय यांचं स्वप्न होतं.
-
ते स्वप्न आता खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आहे.
-
त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी स्वप्नातलं घर बांधलं आहे.
-
अजय यांच्या या नव्या घराचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. अजूनही अजय यांच्या घराचं काम सुरु आहे.
-
फोटोमध्ये छोटं पण अगदी सुंदर घर पाहायला मिळत आहे. घराच्या बाहेरील बाजूला लाल आणि राखाडी रंग देण्यात आला आहे.
-
तसेच घराची सुंदर रचना लक्ष वेधून घेणारी आहे. अजय यांचं हे स्वप्नातलं घर खरंच खूप सुंदर आहे.
-
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची यशोगाथा ‘पावनखिंड’मध्ये दाखवण्यात आली. (फोटो – फाईल फोटो, इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO