-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.
-
सोनम तिचा प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसतेय.
-
बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे अनेक फोटो सोनम शेअर करत असते.
-
नुकतंच सोनमचा बेबी शॉवर कार्यक्रम सोहळा पार पडला.
-
सोनमच्या बेबी शॉवर कार्यक्रमातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
लंडनमध्ये सोनमच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
या बेबी शॉवर सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
गायक लियो कल्याणने सोनमच्या बेबी शॉवर सोहळ्यात आपल्या आवाजाने चार चांद लावले.
-
सोनम कपूरसोबतचा लियो कल्याणचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
त्याच्या पेहरावामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
-
सोनमच्या बेबी शॉवरमुळे चर्चेत आलेल्या गायक लियो कल्याणबद्दल जाणून घेऊया.
-
लियो कल्याण हा एक ब्रिटीश-पाकिस्तानी गायक आहे.
-
लियो उत्तम गीतकार, संगीतकारदेखील आहे.
-
यासोबतच तो मॉडेलिंग क्षेत्रातही नाव कमवत आहे.
-
लिओ एक गे कलाकार आहे. त्याला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती.
-
१३ वर्षाचा असल्यापासून लियोने गाणं गायला सुरुवात केली.
-
परंतु, त्याच्या कुटुंबियांना हे मान्य नसल्यामुळे लियोला घरच्यांपासून लपवून आपली आवड जोपासावी लागत होती.
-
“अनेक कलाकार त्यांच्या लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलत नाहीत. मी गे कलाकार म्हणून नाव कमावत आहे. मला वाटतं मी अनेक गे कलाकारांना कलाविश्वात नाव कामवण्यासाठी मार्ग तयार केला आहे.”, असं लियोचं म्हणणं आहे.
-
लियोने लिहिलेली अनेक गाणी त्याच्या आणि समलैंगिक लोकांच्या आयुष्याचं दर्शन घडवणारी आहेत.
-
लियोचा चाहता वर्गदेखील फार मोठा आहे.
-
त्याचे इन्स्टाग्रामवर ८३.८ हजार फॉलोवर्स असून सोशल मीडियावर लियो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. (सर्व फोटो : लियो कल्याण /इन्स्टाग्राम)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक