-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सायली परब लवकरच आई होणार आहे.
-
काही दिवसांपूर्वीच सायलीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
या कार्यक्रमातील काही फोटो सायलीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये सायलीने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
“एक नवीन सुरुवात….” असे कॅप्शन सायलीने या फोटोंना दिले आहे.
-
डोहाळे जेवणासाठी सायलीने फुलांच्या दागिन्यांनी साज केला आहे.
-
सध्या सायली तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे.
-
सायलीने मालिकांसोबतच नाटक आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
-
‘तू सौभाग्यवती हो’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकेत सायली झळकली होती.
-
‘हुतात्मा’ या वेब सीरिजमध्येही सायलीने काम केले होते.
-
सायलीच्या पतीचे नाव इंद्रनील शेलार असून तो फोटोग्राफर आहे.
-
डिसेंबर २०१९मध्ये सायलीचा साखरपुडा पार पडला होता.
-
१ फेब्रुवारी २०२० रोजी सायलीने लग्नगाठ बांधली.
-
चाहत्यांकडून सायलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली परब / इन्स्टाग्राम)

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video