-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’.
-
अलिकडेच या मालिकेने ७०० भागांचा टप्पा गाठला आहे.
-
या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर अभिषेकच्या पत्नीचे फोटो चर्चेत आहेत.
-
अभिषेक देशमुखच्या पत्नीचे नाव कृतिका देव असं आहे.
-
६ जानेवारी २०१८ रोजी अभिषेक-कृतिका विवाहबंधनात अडकले.
-
अभिषेकप्रमाणेच कृतिका ही एक अभिनेत्री आहे.
-
कृतिकाने ‘राजवाडे अँड सन्स’, ‘हॅपी जर्नी’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे कृतिकाचे अनेक चाहते आहेत.
-
‘पानिपत’ आणि ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटामध्ये ही कृतिकाने काम केले आहे.
-
कृतिका ‘प्रेम हे’ मालिकेच्या सिरीजमध्ये प्रथमेश परबसोबत झळकली होती.
-
अभिषेकही व्यवसायाने अभिनेता, दिग्दर्शक तसेच लेखक म्हणून काम करतो.
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील यशचे पात्र सर्वांचे फार लाडके ठरत आहे.
-
आईच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा, घरातील जबाबदाऱ्या पार पाडणारा, भाऊ-बहिणीची काळजी घेणारा, समजुतदार यश सर्वांना भावतो आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कृतिका देव / इन्स्टाग्राम)

“बलात्कारासाठी ती स्वतःच जबाबदार”, हायकोर्टाची टिप्पणी; आरोपीला जामीन मंजूर