-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
त्यांची या मालिकेमधील कांचन देशमुख ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
-
अर्चना या सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असतात.
-
मालिकेमधून निवांत वेळ मिळताच त्या मालदीवला आपल्या पतीसोबत गेल्या होत्या.
-
यादरम्यानचे त्यांनी काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
-
तसेच अर्चना यांनी त्यांच्या पतीसोबत देखील काही फोटो शेअर केले आहेत.
-
त्यांच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.
-
मालदीवमध्ये राहत असलेल्या हॉटेलमध्ये अर्चना खास पदार्थ बनवत असतानाचा फोटो देखील यामध्ये पाहायला मिळत आहे.
-
अर्चना पाटकर यांनी अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
अर्चना पाटकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
कांचन देशमुख या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली