-
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर नागाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम परतले असल्याची चर्चा आहे. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण…
-
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, नागा चैतन्यचे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत जोडले जात आहे. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
-
नुकतेच नागाने हैदराबादमध्ये नवीन घर घेतले आहे.
-
शोभिताही त्याच्यासोबत या घरी दिसली आहे.
-
यासोबतच हैदराबादमधील शोभिता ज्या हॉटेलमध्ये राहिली तेथेही नागा अनेकदा दिसला होता.
-
शोभिता धुलिपाला एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
-
शोभिताचा जन्म ३१ मे १९९२ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला.
-
शोभिताने मुंबई विद्यापीठाच्या एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले.
-
शोभिताने २०१६ मध्ये ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
यानंतर शोभिताने तेलुगू चित्रपट ‘गुडाचारी’मध्ये काम केले.
-
शोभिताला तिची खरी ओळख अॅमेझॉन प्राइमच्या ‘मेड इन हेवन’ या वेबसीरिजमधून मिळाली. या सीरिजमुळे शोभिताला खरी लोकप्रियता मिळाली.
-
शोभिता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मेजर’ या चित्रपटात होती. (All Photo Credit : Social Media)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख