-
अभिनेता सिद्धार्थ जाधव काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबासह दुबई ट्रिपला गेला होता.
-
मात्र पत्नी तृप्ती जाधवबरोबर एकही फोटो पोस्ट न केल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
सिद्धार्थ-तृप्ती यांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याचं बोललं जात आहे.
-
शिवाय तृप्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जाधव हे आडनाव देखील बदललं आहे.
-
तृप्तीने नावामधील जाधव हे आडनाव काढल्यानंतर सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु झाली आहे.
-
सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तृप्तीने फक्त आपल्या मुलींसोबतचेच दुबईमधील फोटो शेअर केले होते .
-
ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत.
-
पण सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
-
सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.
-
नात्याबाबत होणाऱ्या चर्चांवर सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीने मौन पाळणंच पसंत केलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली