-
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला.
-
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होताना दिसत आहे.
-
जवळपास ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा ते करत आहेत.
-
एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार यावर आता महाराष्ट्राचे राजकारण आणि महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.
-
मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गेल्या महिन्याभरापासूनच चर्चेत आहे.
-
एकनाथ शिंदेंचे राजकारणातील गुरू आनंद दिघे यांच्यावरील ‘धर्मवीर’ हा चित्रपट १३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून आनंद दिघे यांची भूमिका त्याने साकारली होती.
-
प्रसाद ओकच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकदेखील झाले.
-
परंतु, त्यासोबतच चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
-
‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांचा शिष्य आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली आहे.
-
क्षितीशने नाटकापासून आपल्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली.
-
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही क्षितीशने काम केलं आहे.
-
‘बन मस्का’ या मालिकेमध्ये क्षितीश प्रमुख भूमिकेत दिसला होता.
-
‘धर्मवीर’ चित्रपटात क्षितीशने साकारलेली एकनाथ शिंदेंची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील क्षितीशच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
-
याशिवाय ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘गोंद्या आला रे’, ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटातही क्षितीशने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
चित्रपट, मालिकांसोबतच त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
-
अभिनेत्यासोबतच क्षितीश उत्तम दिग्दर्शकदेखील आहे.
-
क्षितीश अभिनेत्री रुचा आपटेसोबत २१ एप्रिल २०२१ रोजी विवाहबंधनात अडकला.
-
एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्समुळे क्षितीश पुन्हा चर्चेत आला आहे.
-
नुकतंच एका वृत्तपत्राने ‘धर्मवीर’ चित्रपटातील क्षितीशचा एकनाथ शिंदेंच्या वेशातील फोटोवरील मीम छापला होता.
-
या छापून आलेल्या मीमबद्दल क्षितीशने नाराजी व्यक्त केली होती.
-
मीम्सचा फोटो शेअर करत क्षितीशने “मोठी राजकीय उलाढाल चालू आहे. चेष्टेमध्ये मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं हे वेगळं. हे असं छापणं चूक आहे.”, असं म्हणत संताप व्यक्त केला होता.
-
(सर्व फोटो : एकनाथ शिंदे, क्षितीश दाते/ इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”