-
सिद्धार्थ जाधव त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि त्याच्या कमाल विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे.
-
विनोदाचं अचूक टाइमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव हे नाव प्रेक्षकांसाठी नवीन नाही.
-
पण सिद्धार्थ जाधव हा सध्या एका वेगळाच कारणामुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थ हा लवकरच त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने सोशल मीडियावरुन जाधव हे सासरचं आडनाव हटवल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.
-
तृप्तीने सोशल मीडियावर अक्कलवार हे तिचं माहेरचं आडनाव लावलं आहे. त्यामुळे सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्यात सारं काही आलबेल नसून ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
मात्र नुकतंच सिद्धार्थने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “या सर्व अफवा कुठून पसरवल्या जात आहेत, हेच मला कळत नाहीत. आम्ही एकत्र आहोत. आमच्यात सर्व काही व्यवस्थित आहे.” असे सिद्धार्थने म्हटले.
-
सिद्धार्थ हा आज जरी एक यशस्वी अभिनेता आहे. तो त्याच्या यशाचे क्षेय नेहमीच आई वडिल आणि पत्नी तृप्तीला देतो. तृप्तीने त्याला फार मोलाची साथ दिली आहे, असेही अनेकदा तो म्हणाला आहे.
-
सिद्धार्थ आणि तृप्ती यांचा प्रेमविवाह झाला आहे. तब्बल ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यांची लव्हस्टोरी फारच खास आहे.
-
सिद्धार्थने रुपारेल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तो पूर्वीपासून नाटकांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका करायचा. यासोबतच त्याने अनेक ठिकाणी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.
-
कॉलेज संपल्यानंतर तो देवेंद्र पेम यांच्याकडे ‘रामभरोसे’ या नाटकासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. या नाटकासाठी ऑडिशन सुरु होते. यासाठी तृप्तीने ऑडिशन दिली होती. त्यावेळी ती नाटकात काम करायची.
-
ज्यावेळी तिने या नाटकासाठी ऑडिशन दिली तेव्हा ती पत्रकारिता शिकत होती. तिने उत्कृष्ट ऑडिशन दिले. सिद्धार्थला ती पहिल्या भेटीतच आवडली होती. तिचे ऑडिशन चांगले असल्याने त्याने तिला अभिनयाबद्दलही विचारले होते. पण तिने नकार दिला होता.
-
तृप्तीला त्यावेळी पत्रकारितेत फार रस होता. त्यामुळे तिने नकार दिला होता. त्यावेळी सिद्धार्थला तिचा बिनधास्तपणा आवडला होता. त्याने तिला भूमिका करण्याबद्दल विनंती केली, पण तिने स्पष्ट नकार दिला.
-
त्यानंतर पुढे ४ ते ५ दिवसात सिद्धार्थला तिच्याबद्दल प्रेम वाटू लागले. यापुढे तृप्ती भेटणार नाही, हे लक्षात येताच त्याने तिला प्रपोज करायचे ठरवले.
-
ते दोघेही एलफिन्स्टन स्टेशनवर उतरायचे. त्यावेळी सिद्धार्थने स्टेशनजवळ भर गर्दीत तिला लग्नाची मागणी घातली. सिद्धार्थला आपण आवडतो, याची तिला कल्पना होती. पण तो प्रपोज करत थेट लग्नाची मागणी घालेल असे तिला वाटले नव्हते.
-
तृप्तीने सिद्धार्थला नकार दिला. पण त्यानंतर त्याने तिला मैत्रीचा हात पुढे केले. कालांतराने त्यांच्यातील मैत्री घट्ट होत गेली.
-
त्यांच्या भेटीगाठी, फोन कॉल्सचे प्रमाण वाढू लागले. अनेकदा सिद्धार्थ तृप्तीला म्हणायचा की जेव्हा तू लग्नाचा विचार करशील तेव्हा माझ्या नावाचा जरुर विचार कर. पण तृप्तीला त्याच्याबद्दल काहीही आकर्षण नव्हते.
-
त्यावेळी दोघेही साधारण २० ते २२ वर्षांचे होते. सिद्धार्थ त्यावेळी फार धडपड करत होता. तो मिळेल त्या छोट्या मोठ्या भूमिका करायचा.
-
तर तृप्ती ही मुळची नागपूरची असली तरी ती कुटुंबाबरोबर मुंबईत राहत होती. तृप्तीचे कुंटुबीय हे दाक्षिणात्य आहे.
-
त्यावेळी तृप्ती कोणाबरोबर बोलली किंवा तिला कोणाचा फोन आला तरी सिद्धार्थला राग यायचा. यामुळे तिने त्याच्या न बोलण्याचा निर्णय घेतला आणि त्याला तसे सांगितले होते.
-
पण त्यानंतर तिला सिद्धार्थबाबत आकर्षण निर्माण झाले. आपण सिद्धार्थसारखा चांगला मित्र गमवायला नको, हे तिला जाणवले. त्यानंतर तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि तब्बल ४ ते ५ वर्षांनी तिने सिद्धार्थला होकार दिला.
-
सिद्धार्थ आणि तृप्ती हे रोज स्टेशनवर भेटायचे. तो तिला नेहमी ५ रुपयाचे चॉकलेट द्यायचा. तिला सुरुवातीला फार गंमत वाटायची. पण नंतर ती याला वैतागली होती.
-
सिद्धार्थने तृप्तीला एल्फिन्स्टन स्टेशनवर १० जुलै २००२ रोजी प्रपोज केले होते.
-
त्यानंतर ५ वर्षांनी म्हणजे १० मे २००७ रोजी ते दोघेही विवाहबंधनात अडकले.
-
त्या दोघांच्या लग्नाला सुरुवातीला दोन्ही घरांकडून विरोध होता. पण काही काळानंतर तो कमी झाला.
-
लग्नानंतर ते दोघेही अंधेरीतील एका घरात भाड्याने राहत होते.
-
त्यावेळी तृप्ती ही नोकरी करत होती.
-
तर सिद्धार्थ हा नाटक, मालिका आणि काही चित्रपटात भूमिका करायचा.
-
सिद्धार्थ आणि तृप्ती गेल्या १२ वर्षांपासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. त्या दोघांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच