-
प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.
-
पण त्याचबरोबरीने अमेरिकमध्ये तिने नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे.
-
‘सोना होम’ नावाचा नवीन ब्रँड तिने लाँच केला आहे.
-
इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने याबाबत माहिती दिली.
-
डिनर सेट, क्रॉकरीसारख्या वस्तू या ब्रँडच्या माध्यमातून प्रियांका लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.
-
विशेष म्हणजे या सगळ्या वस्तूंना प्रियांकाने भारतीय टच देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृती जपण्याचा यामागचा तिचा हेतू आहे.
-
परदेशामध्ये राहत असलेल्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडू नये म्हणून तिने ही नवी कल्पना शोधून काढली आहे.
-
डिनर सेट, क्रॉकरीसारख्या वस्तूंवर पारंपरिक भारतीय डिझाईन ‘सोना होम’च्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळणार आहे.
-
“भारतामधून अमेरिकेमध्ये आल्यावर आपलं अस्तित्व निर्माण करत व्यवसाय सुरु करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं.” असं प्रियांकाने ब्रँड लाँच करताना म्हटलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल